नाराज गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी सर्वात बेस्ट गाणं, 64 वर्षांपासून सुपरहिट, नवीन पिढीमध्ये देखील प्रचंड क्रेझ
तुमची देखील गर्लफ्रेंड नाराज झाली असेल तर तिला मोहम्मद रफी यांचं हे गाणं ऐकवा. जे गेल्या 64 वर्षांपासून आहे प्रचंड सुपरहिट. नवीन पिढी देखील या गाण्याची आहे प्रचंड चाहती.

एखाद्या मुलीच्या सौंदर्याची थोडीशी खोडकर आणि मजेशीर अंदाजात स्तुती करायची असेल तर मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘बार बार देखो, हजार बार देखो…’ हे गाणे आजही तितकेच प्रभावी ठरते. तब्बल सहा दशकांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे.

1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चायना टाउन’ चित्रपटातील हे गाणं शम्मी कपूर आणि शकीला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हातात गिटार घेऊन शम्मी कपूर यांचा उत्साही अंदाज आणि रफींच्या खट्याळ, जोशपूर्ण आवाजाने या गाण्याला वेगळीच रंगत मिळाली.

गर्लफ्रेंडच्या सौंदर्याचे कौतुक करताना त्यात प्रेम, मस्ती आणि शरारत यांचा सुंदर मिलाफ दिसतो. या गाण्याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले असून संगीतकार रवि होते. रफींच्या आवाजातील उत्साह आणि मजरूह यांच्या चुलबुल्या शब्दांना रवि यांच्या सुरांची साथ मिळाल्याने हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

विशेष म्हणजे, शम्मी कपूर यांनी या गाण्यासाठी आधीपासून नृत्याची विशेष तयारी केली नव्हती असे सांगितले जाते. रफींच्या जोशपूर्ण गायकीने प्रेरित होऊन ते स्वाभाविकपणे झूमू लागले आणि त्यातूनच त्यांच्या पुढील काळातील प्रसिद्ध नृत्यशैलीची झलक पाहायला मिळाली.

‘बार बार देखो…’ची लोकप्रियता केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहिली नाही. अनेक दशकांनंतरही या गाण्याची धून जाहिराती, रिअॅलिटी शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते. गाण्याची पहिली ओळ कानावर पडताच पुढची ओळ आपोआप ओठांवर येते, हीच त्याच्या लोकप्रियतेची खरी पावती आहे.