Chanakya Niti: तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नाही का? या सवयी तर नाहीत ना! काय सांगते चाणक्य नीती

| Updated on: May 03, 2023 | 3:21 PM

आपल्या रोजच्या आयुष्यात चाणक्य नीतीतील काही गोष्टी खूपच महत्त्वाचा ठरतात. खासकरून आर्थिक स्थितीबाबत चाणक्य नीतीत काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहे. त्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात.

1 / 5
कधीकधी कठोर परिश्रम केल्यानंतरही आर्थिक समस्या दूर होत नाही. काही जणांना चांगला आर्थिक लाभ मिळतो खरा, पण कमवलेला पैसा फार काळ टिकत नाही. अशा स्थितीत तुम्हाला आचार्य चाणक्य यांचं नीतीशास्त्र माहित असणे आवश्यक आहे.

2 / 5
देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे. जो व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसा कमावतो किंवा कमवलेला पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च करतो, माता लक्ष्मी कधीही त्याच्यासोबत राहत नाही. म्हणूनच माणसाने कधीही चुकीच्या मार्गाने किंवा खोटे बोलून पैसे कमवू नयेत. अशा प्रकारची कमाई व्यक्तीला नफ्याऐवजी आर्थिकदृष्ट्या कमकुवत करते.

3 / 5
माणूस जे पेरतो तेच फळ त्याला मिळते. म्हणजेच वाईट कर्मातून मिळालेला पैसा वाईट कामातच खर्च होतो. त्यामुळे अशा पद्धतीने पैसा कमवू नका असं नीतीशास्त्रात सांगितलं आहे. अशी संपत्ती कधीच टिकत नाही.

4 / 5
पैसा कमावल्यानंतर माणसामध्ये लोभ आणि लालसा निर्माण होते. कमावलेला पैसा कधीही इतरांवर खर्च करत नाही.यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. कमावलेल्या पैशाचा काही भाग दानधर्मात द्यावा, असं चाणक्य नीतीत सांगितलं आहे. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता.

5 / 5
खोटे बोलून कमावलेला पैसा कोणत्याही व्यक्तीसाठी फलदायी ठरत नाही. अशी संपत्ती पाप श्रेणीत गणली जाते. तसेच व्यक्तीला त्रास होतो. मग तुम्ही कितीही मेहनत केली तरी आर्थिकदृष्ट्या तुमची प्रगती होत नाही.