AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : पावसाचं पाणीही बदलू शकतं तुमचं नशीब… धन, संपत्ती आणि आरोग्यावर होईल कृपा; असा करा अचूक उपाय

श्रावणातील पावसाचे पाणी ज्योतिष व वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. स्वच्छ पावसाचे पाणी योग्य प्रकारे वापरल्यास घरात सुख-शांती, सकारात्मकता आणि समृद्धी वाढते. आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या आणि कुंडलीतील कमजोर चंद्र यावर पावसाच्या पाण्याशी संबंधित काही सोपे उपाय करता येतात, ज्यामुळे जीवन आनंदी व समृद्ध होऊ शकते.

| Updated on: Aug 11, 2026 | 1:46 PM
Share
श्रावण महिन्यात पावसाची संततधार सुरू असते. पावसामुळे वातावरण आल्हाददायक होतं, कोरड्या जमिनीला नवसंजीवनी मिळते आणि सर्वत्र हिरवाई पसरते. मात्र, पावसाचे हे पाणी केवळ निसर्गासाठीच नव्हे, तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अनेक उपायांसाठीही महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात स्वच्छ पावसाच्या पाण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून काही सोपे उपाय केल्यास घरात सुख-शांती, सकारात्मकता आणि समृद्धी वाढू शकते. आर्थिक अडचणींपासून आरोग्य आणि कुंडलीतील चंद्र मजबूत करण्यापर्यंत पावसाच्या पाण्याशी संबंधित काही उपाय सांगितले जातात. जाणून घेऊया हे उपाय...

1 / 6
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ‘हा’ उपाय -  तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा पैशांची समस्या जाणवत असेल, तर पावसाच्या पाण्याशी संबंधित हा उपाय केला जातो. यासाठी स्वच्छ पावसाचे पाणी मातीच्या मडक्यात किंवा तांब्याच्या भांड्यात साठवावे. त्यात एक चिमूट हळद मिसळावी. हे भांडं घराच्या उत्तर दिशेला ठेवावं. धार्मिक मान्यतेनुसार, सलग ११ दिवस सकाळी आणि संध्याकाळी या भांड्याजवळ दिवा लावल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे योग निर्माण होतात, असे मानले जाते.

2 / 6
आरोग्यासाठी पावसाच्या पाण्याचा असा करा वापर -   कुटुंबातील एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असेल, तर हा धार्मिक उपाय केला जातो. यासाठी स्वच्छ पावसाचे पाणी स्टील किंवा तांब्याच्या भांड्यात साठवावे.  यानंतर भगवान शिवाची पूजा करून याच पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यासोबत ‘महामृत्युंजय मंत्रा’चा १०८ वेळा जप करावा. या उपायामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र, कोणत्याही आजाराच्या परिस्थितीत केवळ अशा उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे अत्यावश्यक आहे.

3 / 6
कुंडलीतील चंद्र मजबूत करण्यासाठीही उपयोगी? -  ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील कमजोर चंद्राचा संबंध मानसिक अस्वस्थता, झोप न लागणे आणि आत्मविश्वास कमी होण्याशी जोडला जातो. चंद्राला मजबूत करण्यासाठी पावसाचे पाणी हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीत भरून घरातील एखाद्या शांत ठिकाणी ठेवण्याचा उपाय सांगितला जातो.  मान्यतेनुसार, हे पाणी संपूर्ण वर्षभर साठवून ठेवता येते. पुढील वर्षी पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर जुने पाणी काढून त्याऐवजी पावसाच ताजं पाणी भरलं जातं.

4 / 6
पावसाच्या पाण्याशी संबंधित हे सर्व उपाय ज्योतिष, वास्तु आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यामुळे हे उपाय करताना नेहमी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पावसाचे पाणीच वापरावे. तसेच आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

5 / 6
डिस्क्लेमर: वरील माहिती ज्योतिषीय गणना, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

6 / 6
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत