AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026 : गोल्ड मेडलमध्ये आघाडीवर पण एका चुकीने सगळं संपलं; महिला ॲथलीटला अचानक अपात्र ठरवलं

सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर असताना एका चुकीमुळे स्पर्धेतूनच बाहेर पडावं लागलं. लांब उडीच्या प्रकारात महिला खेळाडूने चुकीचे शूज वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या नियमांनुसार तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे.

| Updated on: Sep 25, 2026 | 5:33 PM
Share
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इराणची महिला ॲथलीट फातेमेह मोहितिझादेह हिला मोठा धक्का बसला असून, महिलांच्या हेप्टाथलॉन स्पर्धेतून तिला अचानक अपात्र ठरवण्यात आले आहे. (सर्व फोटो सौजन्यः fatemeh_mohitizadeh/instagram)

1 / 6
शुक्रवारी लांब उडीच्या प्रकारात फातेमेहने स्प्रिंटसाठी वापरले जाणारे स्पाइक्स घातल्याचे निष्पन्न झाले. वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या नियमांतर्गत शूजबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला स्पर्धेबाहेर करण्यात आले.

2 / 6
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर फातेमेह १०० मीटर अडथळा शर्यत, उंच उडी, गोळाफेक आणि २०० मीटर शर्यतीतील दमदार कामगिरीच्या जोरावर ३,४८६ गुणांसह आघाडीवर होती. दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडूपेक्षा ती तब्बल १०० गुणांनी पुढे होती, मात्र एका चुकीमुळे तिची पदकाची आशा संपुष्टात आली.

3 / 6
हेप्टाथलॉनमध्ये एकूण सात प्रकारांचा समावेश असतो आणि फातेमेह दुसऱ्या दिवशीही आघाडीवर होती. मात्र, तिच्या या अचानक अपात्रतेमुळे हेप्टाथलॉनच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला असून आता उर्वरित खेळाडूंमध्ये पदकासाठी चुरस निर्माण झाली आहे.

4 / 6
या महिलांच्या हेप्टाथलॉन स्पर्धेत भारताच्या पूजा आणि अनामिका कोझिनिजापरंबिल या दोन खेळाडूंचेही आव्हान कायम आहे. भालाफेक या सहाव्या क्रीडा प्रकारानंतर या दोन्ही भारतीय खेळाडू अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.

5 / 6
काय आहे ही स्पर्धा?
हेप्टाथलॉन ही ट्रॅक आणि फील्डमधील एक बहु-क्रीडास्पर्धा आहे, ज्यामध्ये एकाच खेळाडूला सात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. हेप्टा म्हणजे सात आणि एथलॉन म्हणजे स्पर्धा. मुख्यत्वे ही महिलांसाठीची मैदानी स्पर्धा आहे, जी सलग दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केली जाते. या स्पर्धेत खेळाडूच्या शारीरिक ताकदीचा, वेगाचा, कौशल्याचा आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.

काय आहे ही स्पर्धा? हेप्टाथलॉन ही ट्रॅक आणि फील्डमधील एक बहु-क्रीडास्पर्धा आहे, ज्यामध्ये एकाच खेळाडूला सात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. हेप्टा म्हणजे सात आणि एथलॉन म्हणजे स्पर्धा. मुख्यत्वे ही महिलांसाठीची मैदानी स्पर्धा आहे, जी सलग दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केली जाते. या स्पर्धेत खेळाडूच्या शारीरिक ताकदीचा, वेगाचा, कौशल्याचा आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.

6 / 6
Follow Us
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष