AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET रद्द करा, या सरकारचा विधानसभेत प्रस्ताव, 12 वींच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याची मागणी

NEET Exam Cancel: युजी-नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीनंतर देशभरातील विद्यार्थ्यांचा राग शांत झालेला नाही. या पेपरफुटीविरोधात सीजेपीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता या राज्य सरकारने थेट नीट परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. काय आहे मोठी अपडेट?

NEET रद्द करा, या सरकारचा विधानसभेत प्रस्ताव, 12 वींच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याची मागणी
NEET रद्द करा, या सरकारचा विधानसभेत प्रस्ताव
| Updated on: Aug 11, 2026 | 1:54 PM
Share

NEET UG Cancel Resolutions: नीट यूजी परीक्षा रद्द करण्याची तयारी सुरू झाली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करण्यासाठी तामिळनाडूमधील जोसेफ विजय यांच्या सरकारने कंबर कसली आहे. राज्य सरकार विधानसभेत नॅशनल एलिजिबिलिटी -कम-एन्ट्रन्स टेस्ट आणि फॉरेन कॉन्ट्रिब्युसन (रेग्युलेशन) अमेंडमेंट बिल, 2026 विरोधात स्वतंत्र ठराव मंजूर करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. जी. अरुणराज यांनी त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव मांडला आहे. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशांसाठीची एकसमान नीट परीक्षा पद्धत रद्द करण्यासाठी प्रस्ताव आणला जाईल आणि केंद्र सरकारला या संबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात येणार आहे. 2021 पासून राज्य सरकार नीट परीक्षेविरोधात आहे.

राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली नाही

यापूर्वी 2021 मध्ये राज्य सरकारने नीट परीक्षेला विरोध केला होता. NEET परीक्षेतून सूट मिळावी यासाठी तामिळनाडू विधानसभेने तामिळनाडू पदवीपूर्व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश विधेयक, 2021 एकमजाने मंजूर केले होते. पण त्यावेळी या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली नव्हती. यावेळी पुन्हा तामिळनाडूने नीट परीक्षेविरोधात एल्गार पुकारला आहे. तामिळनाडू व्यतिरिक्त कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनीही नीट परीक्षेला विरोध दर्शवला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेचे गुणच ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी तामिळनाडू राज्याने केली आहे. त्यासाठी यासंबंधीच्या सर्व कायद्यात दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची मागणी विजय यांच्या सरकारने केली आहे. त्यासाठी विधानसभेत हा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट, 2019

नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन ॲक्ट 2020

नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी ॲक्ट, 2020

इतर संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे

प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी नीट परीक्षा रद्द करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

NEET ला विरोध का?

वारंवार प्रश्नपत्रिका फुटत आहे आणि परीक्षेत मोठा घोटाळा आणि गोंधळ समोर आला आहे

नीट परीक्षा रद्द झाल्याने आणि पुनर्परीक्षेमुळे मुलांवर मानसिक दडपण आले

सामाजिक न्यायाचे धोरण आणि समानतेसाठी NEET घातक

ग्रामीण आणि सामाजिक, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांवर मोठा दबाव

या परीक्षेचा तामिळ भाषिक विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होत आहे

महागड्या कोचिंग क्लासेस आणि शुल्क आकारणाने अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण

शालेय अभ्यासक्रमांकडे नीटमुळे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष

बारावी बोर्ड अभ्यासक्रम नीटमुळे दुय्यम ठरत आहे

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत