
अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.