दहा दिवसांचा पाहुणचार केल्याने लाडक्या बाप्पाला जड अंत:करणाने आज निरोप देण्यात आला. गेले दहा दिवस गणपती बाप्पाच्या आगमना सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरलेले होते.या दहा दिवसात बाप्पाच्या पूजन आणि आरत्या आणि भजनात भक्त मंडळी गुंग होती.गणपतीच्या आगमना सर्वत्र पवित्र आणि आनंदी वातावरण झाले होते. दहा दिवसानंतर आता अनंत चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर येण्याचा लाडका हट्ट धरत भक्ताने आता जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला. गिरगाव, दादर अशा चौपाट्यांवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत पोलिसांनी गणेश विसर्जनाची प्रक्रिया पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.दुसरीकडे नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत नागा साधूंनी केलेले नृत्य देखील चर्चेत आहे.
नाशिक येथील गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत साधूचं नृत्य पाहायला मिळाले.यावेळी या नागासाधूंनी अनोखे नृ्त्य सादर करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले.
2 / 5
नाशिक येथे पोलिस बंदोबस्तात गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी नागा साधूंनी शंकर भोलेनाथाचा अवताराचा भस्म लावलेल्या अवतारातील थराकाप उडविणारे नृत्य सादर करण्यात आले.
3 / 5
एखादा जादूचा प्रयोग असावा असे हे नृत्य होते. बम...बम...भोलेचा गजर करीत हे नृत्य करण्यात आले. या नृत्याने उपस्थितांचे देहभान हरपले.
4 / 5
या नागा साधूंनी सुपर हीरो सारखा वेष धारण केला होता,त्यामुळे त्यांच्या नृत्याने खरेच सुपर हिरो पृथ्वीवर अवतरले की काय असा भास झाला