
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी 2020 मध्ये लग्न केले. अत्यंत खासप्रकारे यांचे लग्न गुरुद्वारामध्ये झाले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्यापासून यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य करताना रोहनप्रीत हा दिसला.

रोहनप्रीत सिंह घटस्फोटाबद्दल बोलताना म्हणाला की, अफवा या फक्त अफवा असतात, त्या खऱ्या नसतात, उद्या कोणी काहीही बोलेल, परवा कोणी काही बोलेल, मग त्याचा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम होऊ देऊ नये.

थोडक्यात काय तर रोहनप्रीत याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, नेहा कक्कर आणि त्याच्यामध्ये काहीही वाद नाहीये. काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कर हिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले.

नेहा कक्कर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियावरही नेहा कक्कर ही सक्रिय दिसते. नेहा कक्कर रोहनप्रीतसोबत फोटो शेअर करते.