
हिंदू मान्यतांनुसार, तुळशीचं रोप हे अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. घरात तुळशीचं रोप लावणं शुभ असतं. जर ते योग्य दिशेने लावलं आणि त्याची योग्य काळजी घेतली तर ते घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे आणि वातावरण शुद्ध करण्याचे काम करते.

तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि असंही मानलं जातं की जिथे तुळशी नेहमीच हिरवी राहते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीभोवती काही प्रकारची झाडे लावणे अशुभ मानले जाते. वास्तुनुसार तुळशीजवळ कोणती झाडे लावू नयेत ते जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ कॅक्टस, गुलाब यांसारखी काटेरी झाडे लावणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की अशी काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे तुळशीमुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक उर्जेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय, काटेरी झाडं ही घरात तणाव आणि अशांतता निर्माण करू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीभोवती दाट सावली देणारी वड, पिंपळ किंवा इतर मोठी झाडे लावणे टाळावे. अशा झाडांची सावली तुळशीवर पडणे अशुभ मानले जाते. तुळशी नेहमी अशा ठिकाणी लावावी जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळेल, जेणेकरून ती निरोगी आणि हिरवीगार राहील.

वास्तुशास्त्रात असा सल्ला दिला आहे की तुळशीजवळ कधीही वाळलेली झाडे ठेवू नयेत. असे मानले जाते की अशी वाळलेली झाडे नकारात्मक उर्जेचा स्रोत बनू शकतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीभोवती जास्त पाणी लागणारी झाडे लावू नयेत. जास्त पाणी तुळशीच्या वाढीसाठी अनुकूल नसते आणि सतत ओली माती त्याच्या मुळांचे नुकसान करू शकते. अशा परिस्थितीत, तुळशीचे रोप हळूहळू कमकुवत होऊ शकते आणि सुकू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, ज्या वनस्पती कापल्यावर किंवा तुटल्यावर त्यातून दुधाळ पांढरा द्रव बाहेर पडतो अशा वनस्पती तुळशीजवळ टाळाव्यात. असे मानले जाते की अशा वनस्पती घराच्या वातावरणावर नकारात्मक प्रभाव पाडू शकतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)