
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे जगभरात अस्वस्थता आहे. खुद्द अमेरिकेतही ट्रम्प यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. भारतावर लादलेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेचेच नुकसान होण्याची शक्यता तिथल्याच तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

याच टॅरिफबद्दल नुकतेच न्यूयॉर्क विद्यापिठाचे सहाय्यक प्राध्यापक अॅडवर्ड प्राइस यांनी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ थेट शून्य करावा तसेच भारताची मागावी असा थेट सल्ला दिला आहे.

सध्याच्या 21 व्या दशकासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध फारच महत्त्वाचे आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवरून चीन आणि रशिया यांच्यातील संबंध कसे असतील हे ठरते. जगातिक पातळीवर भारत हा महत्त्वाचा देश आहे, असे मत अॅडवर्ड प्राइस यांनी व्यक्त केले.


दरम्यान, ट्रम्प यांना त्यांच्याच देशातील लोकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे आता नेमके काय होईल? भारतावरील टॅरिफ लवकरच कमी दूर केला जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.