नुकसान पाहणीसाठी पुढारी बांधावर; सुप्रिया सुळे पुणे, जयंत पाटील सांगली तर प्रीतम मुंडे बीड दौऱ्यावर

| Updated on: Oct 17, 2020 | 5:49 PM

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अवकळा आली आहे. या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत.

1 / 7
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पुरामुळे खराब झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

2 / 7
मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाळुंज येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

3 / 7
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. त्यांनी खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकरी बांधावांना दिलासा दिला.

4 / 7
अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजप खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

5 / 7
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

6 / 7
उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे रणजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी केशेगाव येथील फुटलेल्या मेसाई तलावाला भेट देऊन कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.

7 / 7
शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.