ओसाड रस्ते, बंद दुकाने आणि सर्वत्र शुकशकाट… दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामची स्थिती काय? पहिले फोटो समोर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरचा पर्यटन उद्योग संकटात सापडला आहे. पर्यटक पळून जात असून, बुकिंग रद्द होत आहेत. रस्ते शांत झाले आहेत. या हल्ल्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.

| Updated on: Apr 24, 2025 | 7:53 PM
1 / 9
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम आता जम्मू-कश्मीरच्या पर्यटन उद्योगावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटकांनी गजबजलेल्या रस्त्यांवर आता पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.

2 / 9
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील बहुतांश रस्त्यावर सर्वत्र सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. तसेच या ठिकाणची संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनप्रमाणे दृश्य दिसत आहे.

3 / 9
पहलगाम आणि आसपासच्या भागातील मंदिरे आणि मशिदीसुद्धा पर्यटकांविना ओस पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

4 / 9
जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायातून 2030 पर्यंत 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता हे शून्यावर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

5 / 9
स्थानिक लोकांच्या मते, हा हल्ला केवळ पर्यटकांवर नसून काश्मीरवर आहे. जम्मू-कश्मीरच्या एकूण अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा आठ टक्के आहे. 2024-25 मध्ये राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) सात टक्क्यांची वाढ झाली आहे, यातील सर्वाधिक वाढ ही पर्यटन क्षेत्राची आहे.

6 / 9
काही ट्रॅव्हल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरसाठी करण्यात आलेल्या 90 टक्के बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत.

7 / 9
तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत 20 विमानांमधून 3,337 प्रवाशांनी श्रीनगरवरुन परतीची उड्डाणे घेतली.

8 / 9
इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांनी श्रीनगरमधून त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसारच्या सेवांव्यतिरिक्त एकूण सात अतिरिक्त विमानांची व्यवस्था केली. पहलगामसह जम्मू-कश्मीरमधील अनेक ठिकाणांहून पर्यटक आता त्यांच्या घरी परतत आहेत.

9 / 9
काही टूर ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अनेक पर्यटकांनी वैष्णोदेवीसाठीच्या बुकिंग्सही रद्द केल्या आहेत. या हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.