
बॉलिवूडमध्ये असे अनेक टॉप अभिनेते आहेत, ज्यांचा जन्म पाकिस्तानात झाला. पण भारतात त्यांनी खूप नाव कमावले. फळणीमध्ये पाकिस्तानातून अनेक कुटुंबे भारतात आली होती, ज्यामध्ये अनेक सुपरस्टार्सचाही समावेश आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री विषयी सांगणार आहोत, जिच्या वडिलांचा जन्म दिल्लीत झाला होता. पण आज याच अभिनेत्रीचा पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत दबदबा पाहायला मिळत आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती पाकिस्तानी नाटके आणि चित्रपटांमध्ये अनेक मोठे विक्रम रचत आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. 15 वर्षांच्या मुलासमोर दुसरे लग्न करणारी ही अभिनेत्री पाकिस्तानातील मोठे नाव आहे. तिला शाहरुख खानच्या सासूने पसंत केले होते आणि नंतर ती किंग खानसोबत रोमांस करताना दिसली.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानबद्दल आम्ही सांगत आहोत. तिने शाहरुख खानसोबत ‘रईस’ चित्रपटात काम केले आहे. खरेतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितले होते की, शाहरुख खानच्या सासू सविता छिब्बर यांनी माहिराचे नाव सुचवले होते. त्या माहिराचा शो ‘हमसफर’ पाहत होत्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की या भूमिकेसाठी माहिरा योग्य असेल.

मात्र, आता भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अनेक चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकले नाहीत. तरीही, माहिरा खान पाकिस्तानातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिने पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट दिला आहे. ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’मध्ये माहिरा खान फवाद खानसोबत होती.

माहिरा खान एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेते. मात्र, तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. त्यामुळे ती खूप ट्रोलही झाली होती. न्यूयॉर्कमधील तिचे आणि रणबीर कपूरचे धूम्रपान करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर तिने माफीही मागितली होती.

आता माहिरा खानच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर तिचा जन्म कराचीतील एका मुहाजिर कुटुंबात झाला. तिने स्वतः सांगितले होते की तिचे आई-वडील पठाण आहेत. तसेच तिचे वडील हफीज खान यांचा जन्म दिल्लीत झाला होता. ब्रिटिश राजवटीदरम्यान दिल्लीत जन्मलेले तिचे वडील विभाजनादरम्यान पाकिस्तानात गेले होते.

माहिरा खान तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली होती. अभिनेत्रीचे पहिले लग्न 2007 मध्ये अली असकरी यांच्याशी झाले होते. या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. मात्र, 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2 ऑक्टोबर 2023 रोजी तिने दुसरे लग्न केले.