Photo | भारतीय संघात 17 व्या पदार्पण, यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची खास कारकीर्द

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवत आहे. हे सांगताना त्याचं मन भरुन आलं होतं.
- भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवत आहे. हे सांगताना त्याचं मन भरुन आलं होतं.
- पार्थिव पटेलने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी पार्थिव पटेल हा भारताकडून कसोटी खेळणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला होता. त्यावेळी पार्थिव पटेलचे वय 17 वर्षे 153 दिवस इतके होते.
- त्यानंतरच्या काळात पार्थिव पटेलने समाधानकारक कामगिरी केली. मात्र, 2004 मध्ये महेंद्रसिंह धोनी आणि दिनेश कार्तिकच्या प्रवेशानंतर पार्थिव पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. 2018 साली पार्थिव पटेल भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
- भारताकडून पार्थिव पटेल 25 कसोटी सामने आणि 38 एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय, भारताकडून दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याची संधीही पार्थिवला मिळाली होती. तसंच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 194 मॅच खेळल्या.
- 2015 मध्ये पार्थिव पटेलने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना 339 धावा केल्या होत्या. गेल्यावर्षीही आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता. त्याचवर्षी गुजरातच्या संघाला विजय हजारे चषक मिळवून देण्यात पार्थिव पटेलचे मोलाचे योगदान होते. मात्र, यंदाच्या वर्षात पार्थिव पटेलला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.





