
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच कुणाल बेनोडेकरसोबत तिचा साखरपुडा पार पडला.

आता तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाडव्याच्या खास शुभेच्या दिल्या आहेत.

तिनं कुणालसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोमध्ये ती अतिशय खूश दिसत आहे.

'पुढच्या वर्षीचा पाडवा as Mrs' असं मजेदार कॅप्शनही तिनं या फोटोला दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच तिनं प्रीवेडिंग फोटोशूट केला होता. हे फोटोसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.