Photo : भाऊबीजसाठी गिफ्ट खरेदी करायचं, हे पर्याय उत्तम
भाऊबीजेला गिफ्ट काय देऊ अशा विचारात तुम्ही असाल तर या आयडियांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो. (Some gift ideas for Bhaiduj 2020)

- स्मार्ट वॉच : सध्या स्मार्ट वॉचचा ट्रेन्ड आहे. त्यामुळे सगळ्यांना या स्मार्ट वॉचचं क्रेझ आहे. शिवाय आता फेस्टिव्ह ऑफरमध्ये तुमच्या बजेटमध्ये स्मार्ट वॉच विकत घेता येतील. यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे.
- काही लोकांना पुस्तकांवर प्रचंड प्रेम असतं. त्यामुळे पुस्तक भेट म्हणून देणं उत्तम ठरू शकतं.
- चॉकलेट : लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेटचं वेड असतं. त्यामुळे कधीही कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी चॉकलेट परफेक्ट गिफ्ट ठरतं.
- दागिने : बजेट चांगलं असेल तर दागिने देणं उत्तम पर्याय आहे. ही एक चांगली गुंतवणूक आहे.
- मोबाईल : सध्या नवनवीन मोबाईल मार्केटमध्ये येत आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये नवे फिचर्स आले आहेत. त्यामुळे गॅजेट लव्हर्सला मोबाईल गिफ्ट करणं उत्तम पर्याय आहे.





