
अनेकदा रस्त्यात पैसे सापडतात, तुमच्यासोबत देखील कधीतरी तरी अशी घटना घडली असेल, यातील काही लोक हे पैसे उचलतात आणि आपल्यासोबत ठेवतात, तर काही जण हे पैसे मंदिरामध्ये दान करतात.


एका भक्ताने त्यांना विचारलं की जर रस्त्यावर पैसे सापडले तर ते आपल्यासोबत ठेवावेत का? यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, रस्त्यावर सापडलेले पैसे कधीही आपल्याजवळ ठेवू नयेत.

कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.

जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

जर तुम्ही हे पैसे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी दान करता, तेव्हा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.