
पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 21 वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा हप्ता या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. अर्थात अधिकृतपणे कोणताही तारीख अजून समोर आलेली नाही. त्यासाठी अनेक नियम बदलण्यात आले आहे.

या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी क्रमांक देणे बंधनकारक आहे. ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. सोबतच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी संबंधित त्यांचे बँक खात्याची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. यामध्ये एक जरी चूक असेल तर ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही.

सरकार यावेळी शेतकऱ्यांना अतिरिक्त दिलासा देण्यावर विचार करत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हप्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दोन हजार रुपयांऐवजी चार हजारांचा हप्ता मिळू शकतो. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण त्यासाठी ईकेवायसी करणे गरजेचे आहे. हे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.

अनेकदा शेतकऱ्यांचं नाव चुकते. त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकते वा बँक खाते क्रमांक अथवा IFSC क्रमांक टाकताना चूक होऊ शकते. छोटी टाईपो मिस्टेक, चूक मोठी फटका बसणारी ठरते. पैसे अटकतात. बँक खात्याचा चुकीचा क्रमांक टाकला तर हप्ता जमा होत नाही. अथवा IFSC कोड चुकीचा टाकल्यास ही रक्कम खात्यात जमा होत नाही.

त्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.

ईकेवायसी करताना नेहमी आधार आणि बँकेचा तपशील जुळतो का हे तपासा. पोर्टलवर लॉगिन करतेवेळी माहिती पुन्हा पुन्हा तपासा. ही माहिती जमा केल्यावर सपोर्ट नंबर वा हेल्पलाईन क्रमांकावरुन ती कन्फर्म करा. म्हणजे हप्ता चुकणार नाही.