
अयोध्या नगरीत आज उत्साहाचं वातावरण आहे. कारण राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. त्यासाठी हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे. काहीच वेळाआधी ते मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पोहोचले तेव्हाचा हा फोटो... पारंपरिक वेशात नरेंद्र मोदी राम मंदिरात पोहोचले.

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते महापूजा केली जात आहे.

नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधींना सुरुवात झाली आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे.