नरेंद्र मोदी यांचा कोकण दौरा; शिवरायांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार

| Updated on: Dec 04, 2023 | 9:11 AM

PM Narendra Modi on Sindhudurg Daura Security System : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. पाहा त्यांचा दौरा कसा असेल?

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मालवणमध्ये तुफान बॅनरबाजी करण्यात आली आहे.

2 / 5
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. तसंच नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे.

3 / 5
पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  4 हजार पोलीस, 400 पोलीस अधिकाऱ्यांसह 500 होमगार्ड तैनात असणार आहेत. प्रशासनाकडून मोदींच्या दौऱ्यासाठी चोख आणि कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

4 / 5
मालवणच्या या संपूर्ण परिसरात चिपी एअरपोर्ट पासून ते तारकर्ली बीचपर्यंत आणि राजकोट किल्ल्यापर्यंत शिवसेनेकडून राज्य सरकारकडून आणि भाजपकडून जवळपास 4 हजार बॅनर्स लावण्यात आले आहेत.

5 / 5
आमदार रवींद्र पाठक यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात लागले आहेत. ते या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का? अशी चर्चा होऊ लागली आहे.