Photo Political leaders Pola : पोळा सण मोठा नाही आनंदाला तोटा, विदर्भातील राजकीय नेत्यांनी केली बैलांची पूजा
पोळा हा विदर्भातील मोठा सण आहे. या निमित्त शेतकरी बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतो. काल बैलपोळ्याला शेतकऱ्यांनी बैलांची पूजा केली. राजकीय नेतेही त्यात मागे नव्हते.

विदर्भातील राजकीय नेत्यांनी केली बैलांची पूजाImage Credit source: facebook
- भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील निवासस्थानी पोळ्यानिमित्त कुटुंबीयांसह बैलांची पूजा केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवांच्या पाठीराख्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
- काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे मोठ्या जल्लोषात बैलपोळा साजरा केला. नानाभाऊ पोळ्यात सहभागी झाले. बैलपूजन केले. ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले.
- माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बळीराजाच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व असणारा बैलपोळा सण कुटुंबासमवेत नागपूर येथे साजरा केला. मायबाप शेतकऱ्यांना सदैव सुगीचे दिवस राहावे आणि सर्वांचा अन्नदाता सुखी रहावा ही प्रार्थना केली.
- माजी मंत्री परिणय फुके यांनी पोळानिमित्त नागपूर येथील राहत्या घरी शेतकऱ्यांचे साथीदार असलेल्या ‘सर्जा-राजा’चे सहकुटुंब पूजन केले.
- पूर्व विदर्भात गावोगावी पोळा साजरा करण्यात आला. बैलांची संख्या कमी झाली असली, तरी त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.





