Photo : हमरेकू तुमरेकू बोलने आया खूप है… हिंदी सक्ती विरोधात हे अभिनेते, दिग्दर्शक, कवी आक्रमक; मुंबईत झळकले बॅनर्स

हिंदी सक्तीविरोधातील वातावरण प्रचंड तापलं आहे. येत्या 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधुंनी काढलेल्या मोर्चाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. केवळ राजकीयच पक्ष नव्हे तर सिने कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि कविंनीही या हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे.

Updated on: Jun 28, 2025 | 12:58 PM
1 / 8
राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची असणार आहे. त्याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. ठाकरे बंधूंनी या निर्णायाविरोधात मोर्चाची हाक दिली असून दोन्ही बंधू मोर्चा सामील होणार आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटासह इतर राजकीय पक्षांनी या मोर्चाला भक्कम पाठिंबा दिल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. एवढंच नव्हे तर या हिंदी सक्तीच्या विरोधात आता कवी, लेखक, दिग्दर्शक आणि मराठी कलाकारही मैदानात उतरले आहेत. साहित्यिक आणि कलाकारांचे हिंदीला विरोध करणारे बॅनर्स मुंबईत झळकले आहेत.

2 / 8
साहित्यिक आणि कलावंताच्या या बॅनर्सवर फक्त राज ठाकरेंचा फोटो आहे. मनसेचं चिन्ह आहे आणि कलाकार आणि साहित्यिकांचा फोटो मजकुरासहीत आहे. या मजकुरातून कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 8
अभिनेता सुमित राघवन यानेही आपली भूमिका मांडली आहे. कृपा करून हिंदी सक्तीचा मुद्दा बाजूला सारावा. माझी सरकारला नम्र विनंती आहे की, या निर्णयाबाबत सरकारने फेरविचार करावा. अनेक साहित्यिक, काही पक्षांचा या मोर्चाला पाठिंबा लाभला आहे, म्हणूनच मीही यामध्ये हिरिरीने उतरलेलो आहे. मी जरी हिंदीत काम करत असलो तरीही अशा प्रकारे हिंदी सक्ती होता कामा नये, असं सुमित राघवनने म्हटलं आहे.

4 / 8
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही हिंदीला विरोध दर्शवला आहे. हिंदी तिसरी भाषा म्हणून मुलांवर लादायची गरज काय? हमरेकू तुमरेकू बोलनेको आया खूप है. मराठी व्यवहारात असणे महत्त्वाचे, असा चिमटा सचिन गोस्वामी यांनी काढला आहे.

5 / 8
सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रिभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटलं नाही. त्रिभाषा सूत्र असे म्हणत मेख मारली आहे. लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका, चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदी सक्तीची करू नये, अशी परखड भूमिका सुप्रसिद्ध साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी मांडली आहे.

6 / 8
का आमच्या मुलांनी पहिलीपासून हिंदी शिकायची? त्यांना वाटलं तर शिकतील न ते... आमच्या चिमुकल्यांवर हिंदीची सक्ती करणाऱ्या सरकार, मंत्री, संस्था आणि व्यक्ती यांचा मी निषेध करते, असं संवाद लेखिका मिथिला सुभाष यांनी म्हटलं आहे.

7 / 8
मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे. हिंदी मोडकी तोडकी येतेच आहे की सगळ्यांना. पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे... भारत हा आपला देश आहे आणि या देशातल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत. पण मावशी जगवायला आणि वाढवायला आईला कोणी मारत नाही, असा टोला दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे यांनी लगावला आहे.

8 / 8
हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया ह्या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईल, अशी घोषणा प्रसिद्ध कवी हेमंत दिवटे यांनी केली होती. दिवटे यांची या घोषणेचे बॅनर्स मुंबईत झळकले आहेत.