Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं खास बर्थडे सेलिब्रेशन, फोटोंमधून कुटुंबाचीही दिसली खास झलक

Prajakta Mali Birthday Celebration : अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस कुटुंबियांसोबत साधेपणाने साजरा केला. जंगी सेलिब्रेशन टाळून तिने कुटुंबीयांसोबत भातलावणीतही सहभाग घेतला. तिच्या कुटुंबाचीही खास झलक या फोटोंमधून दिसली असून चाहत्यांनी भरभरून लाईक्स देत प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या.

| Updated on: Aug 11, 2026 | 11:05 AM
1 / 7
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने कुटुंबियांसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. विशेष म्हणजे यातून तिच्या कुटुंबियांचीही झलक दिसली आहे. ( All Photos : Instagram / Prajaktta Mali)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने कुटुंबियांसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. विशेष म्हणजे यातून तिच्या कुटुंबियांचीही झलक दिसली आहे. ( All Photos : Instagram / Prajaktta Mali)

2 / 7

श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्राजक्ताने या खास दिवसाची सुरूवात केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतल्याचे दिसून आलं.

3 / 7

मात्र त्यानंतर वाढदिवसाचं जंगी, ग्लॅमरस सेलिब्रेशन करण्याऐवजी तिने साधेपणाने, आपल्या लोकांसोबत हा दिवस घालवत वाढदिवसाचा आनंद घेतला.

4 / 7

कुटुंबियांसोबत वेळ घालवत, केक कापतानाचे काही फोटो तिने शेअर केले.

5 / 7

त्यानंतर तिने सर्वांसोबत शेतात भातलावणीतही सहभाग घेतला. त्याचेही काही कॅप्चर केलेले क्षण तिने चाहत्यांना दाखवले. या फोटोंमध्ये ती चिखलाने भरलेल्या शेतात उतरून भाताची रोपं लावताना दिसली. त्यावेळी प्राजक्ता आणि तिच्या जवळच्या व्यक्तीही या श्रमदानात सहभागी झाल्या होत्या.

6 / 7

वाढदिवसाच्या दिवशीच प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने आता व्हेगन व्हायचं ठरवलं आहे.

7 / 7

हा निर्णय फक्त स्वतःच्या इच्छेने घेतलेला नाही, तर शरीराने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणे बंद केलं आहे. त्यामुळे मला सतत खोकल्याचा त्रास होत आहे, असं नमूद करत प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us