प्रसाद जवादेच्या आईचं कर्करोगाने निधन; सून अमृताची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी!

'पारू' या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद जवादेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसादच्या आईचं कर्करोगाने निधन झालं. पत्नी अमृता देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

| Updated on: Dec 29, 2025 | 8:00 PM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादेच्या आईचं निधन झालं. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसादची आई प्रज्ञा जवादे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुखने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
'अगदी पहिल्या दिवसापासून त्या माझ्याशी कधीच सून म्हणून वागल्या नाहीत. मी त्यांची मुलगी होते...सहजपणे, कोणत्याही प्रयत्नांशिवाय. नावांना कधीच महत्त्व नव्हतं. काकू/मम्मी - प्रेम मात्र तेच राहिलं आणि त्यांचं प्रेम शुद्ध, निष्पाप आणि नि:शंक होतं', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
याविषयी अमृताने पुढे लिहिलं, 'त्यांचं मराठी भाषा, कविता, शब्दांवरील प्रेम.. हेच आमचं शांत बंधन होतं. दीर्घ संवाद, साध्या भावना आणि गहन अर्थ. ते चमचमणारे राखाडी डोळे, तीच आपुलकी, जी प्रसादच्या फिकट तपकिरी डोळ्यांमध्ये आजही जिवंत आहे.'

4 / 5
'तुम्ही मला ज्या प्रकारे सांभाळलात, त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम केलंत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नेहमीच तुमची मुलगी राहीन. प्रज्ञा जवादे (15 सप्टेंबर 1960 - 28 डिसेंबर 2025).

5 / 5
'आणि सर्वात शेवटी... त्यांचा मुलगा प्रसाद आणि पप्पा यांचा खूप अभिमान वाटतो. ज्या प्रकारे त्या दोघांनी त्यांचा हात धरून त्यांच्या प्रवासात त्यांना साथ दिली, त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत,'