काय आहे ‘वनतारा’?, जेथे पीएम मोदी यांनी 7 तास घालवले, अंबानींशी आहे खास नातं

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचा दौरा पूर्ण केल्यानंतर ते गुजरातच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी तीन दिवसांच्या आपल्या दौऱ्याआधी १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराला भेट दिली. तेथे विधीवत पूजा केल्यानंतर त्यांनी जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यानंतर त्यांनी गीर अभयारण्यात काल व्याघ्र आणि लायन सफारीला भेट दिली, त्यानंतर त्यांनी जामनगरातील वनतारा देखील भेट देत प्राण्यांसोबत काही क्षण व्यतित केले.

| Updated on: Mar 04, 2025 | 7:43 PM
1 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशी सोमनाथ मंदिराला भेट देऊन जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

2 / 9
'वनतारा' हे वाईल्ड एनिमल रेस्क्यू सेंटर जामनगर येथील रिफायनरीच्या जवळ वसलेले खाजगी अभायारण्य आहे. यात अनेक अनोखे प्राणी जतन करुन ठेवले आहेत.

3 / 9
वनतारामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'केचअप' आणि 'चटणी' यांच्या सोबत थोडी दंगा मस्ती केली.हे तरुण ओरांगुटान जातीची माकडे आहेत. जी खोडकर म्हणून ओळखली जातात.

4 / 9
पीएम नरेंद्र मोदी या फोटोत जगातून नाहीशा झालेल्या प्रजाती Spix's Macaw या अनोख्या पक्ष्याशी संवाद साधताना दिसत आहेत.

5 / 9
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या जामनगरातील वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू सेंटर 'वनतारा'चे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसोबत काही क्षण घालवले

6 / 9
पीएम मोदी रेस्क्यू केलेल्या हत्तींशी जणू संवाद साधत आहेत. वनतारामध्ये हत्तींच्या संरक्षणासाठी स्वतंत्रपणे  एलिफंट कँप तयार केला आहे फोटोत तुम्ही पाहू शकता की हत्तींची हायड्रोथेरेपी चालू आहे

7 / 9
 वनतारामध्ये पीएम नरेंद्र मोदी यानी रेप्टाइल्स या अत्यंत दुर्लभ प्रजातीच्या Two Headed Boa या सापाच्या जातीला पाहीले. या प्रजातीला दोन तोंड असतात.

8 / 9
बिबट्यांच्या बछड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बाटलीतून दूध पाजताना दिसत आहेत. बिबट्यांच्या आईपासून दूरावलेल्या बछड्यांचे संपूर्ण आयुष्यभर पालन पोषण करावे लागते. कारण ते आईशिवाय शिकार करण्याचे गुण शिकू शकत नाहीत...

9 / 9
वनतारामधील आपली  ट्रीप समाप्त केल्यानंतर पीएम मोदी यांनी शेवटी एका छोट्या सील प्राण्याशी हितगुज केली.जाता पंतप्रधान मोदी यांनी या छोट्या सीलला तुला भेटून छान वाटले असे म्हणत तिला टाटा देखील केला.