
गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मोठ्या वादामध्ये अडकलीये. तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

आता नुकताच प्रिया आहुजा हिने असित कुमार मोदीवर गंभीर आरोप केले असून चक्क मालिकेच्या सेटवरील वातावरणावर देखील खुलासा केला आहे.

असित मोदी यांना इतर लोकांना भीक मागवायला प्रचंड आवडते. त्यांनी मला द कपिल शर्मा शोमध्ये आणि काैन बनेगा करोडपतीमध्ये घेऊन गेले नव्हते.

मला याचे वाईट वाटले, मात्र मालव याच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता म्हणून मी शांत बसले. बऱ्याच वेळा काहीही कारण नसताना टार्गेट केले जाते.

तुम्हाला काम मिळू नये, यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वीच जेनिफर मिस्त्री हिने देखील असित मोदींवर गंभीर आरोप केले होते.