
अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामत हे दोघं फिटनेसच्या बाबतीत अत्यंत सजग असतात. व्यायाम, वर्कआऊट हा दोघांच्या 'डेली रुटीन'चा एक अविभाज्य भाग आहे. नुकतेच दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

'एकत्र आल्यावर सामर्थ्य अधिक चांगलं दिसतं,' असं कॅप्शन देत प्रिया बापटने हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये प्रियाचेही ॲब्स पहायला मिळत आहेत. या दोघांचा कमालीचा फिटनेस पाहून चाहतेही भारावले आहेत. तर कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट्स केले आहेत.

'कडक' अशी कमेंट अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केली आहे. तर सखी गोखले, तेजस्विनी पंडित, रणविजय सिंघा, सिद्धार्थ बोडके, सिद्धार्थ मेनन, प्राजक्ता शुक्रे, एजाज खान, प्राप्ती रेडकर यांनीसुद्धा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रियाने तिच्या 'टोन्ड' बॉडीचेही काही फोटो शेअर केले आहेत. प्रिया विविध मुलाखतींमध्ये तिच्या फिटनेस रुटीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. लॉकडाऊनदरम्यान जिम वगैरे बंद असतानाही ती घरच्या घरी कशा पद्धतीने व्यायाम करायची, याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं.

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी ऑक्टोबर 2011 मध्ये लग्न केलं. त्यांचे 'फिटनेस गोल्स' चाहत्यांनाही प्रेरणा देणारे आहेत.