रोजंदारीवर जाणाऱ्या कामगाराला 35 कोटींचा कर भरण्याची नोटीस, चौकशी करताच मोठा घोटाळा समोर!

रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजुराला थेट 35 कोटींचा कर भरण्याची नोटीस आली आहे. या नोटिशीमुळे मजूर चांगलाच घाबरला असून आता नेमके काय करावे, हे त्याला समजत नाहीये. विशेष म्हणजे चौकशी केल्यानंतर भंयकर कांड समोर आला आहे.

Updated on: Nov 15, 2025 | 9:42 PM
1 / 5
सरकारी कारभाराचा फार गोंधळ असतो, असे नेहमीच म्हटले जाते. त्याची प्रचिती अनेकवेळा आलेलीदेखील आहे. सध्या असेच एक अचंबित करणारे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजुराला जीएसटी विभागाकडून तब्बल 35 कोटी रुपयांचा कर भरण्यासाठी नोटीस आली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार पंजाबमधील मोगामधील बोहना येथील आहे. या गावात अजमेर सिंह नावाच्या एका रोजंदारीवर जगणाऱ्या मजुराला जीएसटी विभागाने ही नोटीस पाठवली आहे. या मजुराला आपले कुटंब पोसण्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते. असे असताना आता तब्बल 35 कोटी रुपयांची नोटीस आल्याने नेमके काय करावे? असा प्रश्न या मजुराला पडला आहे.

3 / 5
हा प्रकार घडल्यानंतर अजमेर सिंह यांनी जीएसटीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नावाने  Cee Kay International नावाची एक खोटी कंपनी चालू करण्यात आली आहे.

4 / 5
ही कंपनी चालू करण्यासाठी अजमेर सिंह यांच्या पॅन तसेच आधार कार्डचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे याची कोणतीही कल्पना अजमेर सिंह यांना नाही. या कंपनीने अजमेर सिंह यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले आहेत.

5 / 5
दरम्यान, आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सगळेच थक्क झाले आहेत. या भोंगळ कारभारामुळे अजमेर सिंह यांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याआधीही त्यांना 2022 साली जीएसटी विभागाकडून तब्बल 21 लाख रुपये कर भरण्याची नोटीस आली होती.