
सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या घरात गणरायाचं स्वागत केलं. अशातच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननेही त्याच्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलाबाळांसह गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आहे. पत्नी स्नेहाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली. तिने पुजेचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

या खास प्रसंगी स्नेहीने काळ्या रंगाची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. तर अल्लू अर्जुनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं. पण या फोटोंमधील एका गोष्टीमुळे सध्या नेटकरी अल्लू अर्जुनच्या पत्नीला ट्रोल करत आहेत.

स्नेहाने गणपतीच्या पुजेदरम्यान काळ्या रंगाची साडी नेसली म्हणून नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. 'पूजेदरम्यान काळी साडी का नेसली', असा सवाल एका युजरने केला. तर 'पूजेत काळ्या रंगाचे कपडे घालणं अशुभ मानलं जातं', असं दुसऱ्याने लिहिलंय.

'इतकी मोठी लोकं सणावाराला काळे कपडे घालतात, काय म्हणायचं आता', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टोमणा मारला आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या कुटुंबीयांसह मिळून गणेशोत्सव साजरा केला आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचाही वर्षाव होत आहे.