कोण आहे ‘राख’ची सुमन? सौंदर्याच्या बाबतीत ‘धुरंधर’च्या यलिनालाही टाकते मागे
सोनाली बेंद्रे, राकेश बेदी, अली फजल, आमिर बशीर यांच्या भूमिका असलेल्या 'राख' या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कुख्यात रंगा-बिल्लाच्या केसवर आधारित या सीरिजमधील सुमनच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच 'राख' ही वेब सीरिज स्ट्रीम होत आहे. अली फजल आणि सोनाली बेंद्रे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या क्राइम थ्रिलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या सीरिजमध्ये 16 वर्षीय सुमन अरोराची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

या वेब सीरिजची कथा भारतीय इतिहासातील सर्वांत मोठे गुन्हेगार रंगा आणि बिल्ला यांच्यावर आधारित आहे. दोन मुलांच्या अपहरण आणि हत्येची ही थरारक कथा आहे. यात एका 16 वर्षीय मुलीचाही समावेश असतो. 'राख' सीरिजमध्ये तिचं नाव सुमन असं दाखवलं गेलं आहे.

या वेब सीरिजमध्ये सुमनची भूमिका अभिनेत्री दिव्या शर्माने साकारली आहे. दिव्या ही मूळची मुंबईच असून तिने बालकलाकार म्हणून सिनेविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता 'राख' या सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होत आहे.

दिव्याने तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयकौशल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सौंदर्याच्या बाबतीत दिव्या 'धुरंध'मधल्या यलिनाला म्हणजेच अभिनेत्री सारा अर्जुनलाही मागे टाकत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दिव्याच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक सुंदर फोटो पहायला मिळतात.

दिव्या फक्त 'राख' या वेब सीरिजमध्येच नाही तर 'ग्राम चिकित्सालय'मध्येही झळकली होती. या सीरिजमध्ये तिने जूहीची भूमिका साकारली होती. आता 'राख'च्या यशानंतर तिला आणखी चांगले ऑफर्स मिळणार असल्याची चर्चा आहे.