
तुम्ही आतापर्यंत अनेक विमानतळं पाहिली असतील. जगातल्या जवळपास सर्वच विमानतळांवर असलेल्या रनवेचा वापर फक्त विमानांच्या उड्डाणासाठी होतो. मात्र जगात अशी एक जागा आहे ज्या रनवेवरून रेल्वे आणि विमान असे दोन्हीही धावतात. (सांकेतिक फोट, फोटो सौजन्य- मेटा एआय)

न्यूझिलंडच्या गिसबोर्न एअरपोर्टवर हे दृश्य पाहायला मिळते. या विमानतळावर विमान आणि रेल्वे दोन्हीही एकाच रनवे वरून धावतात. त्यामुळेच कधी विमानाला थांबावे लागते तर कधी रेल्वेला विमानाला वाट करून द्यावी लागते.

गिसबोर्न हे शहर न्यूझिलंडच्या नॉर्थ आयलँडच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. हे विमानतळ जवळपास 160 हेक्टर परिसरात उभारण्यात आलेले आहे. याच विमानतळावर एक रेल्वे रुळ आहे. (सांकेतिक फोट, फोटो सौजन्य- मेटा एआय)

विमानतळाच्या मुख्य रनवेच्या मधोमध पॉल्मर्सटन-नॉर्थ-गिसबोर्न रेल्वे लाईन आहे. त्यामुळे गिसबोर्न विमानतळाचे या रेल्वेलाईनमुळे दोन भाग होतात. (सांकेतिक फोट, फोटो सौजन्य- मेटा एआय)

आता एकाच रन वेवर रुल्वे रुळ आणि विमानासाठी रनवे असल्याने अपघात होत नाही का? असा प्रश्न विचारला जातो. मात्र इथे अपघात होत नाही.
