
कपिल शर्मापासून ते शहनाज गिलपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कडक शिस्तीचं पालन करत, डाएट करत आणि जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल करत स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. हे सहा सेलिब्रिटी स्टार्स कोणकोणते आहेत, ते पाहुयात..

कॉमेडियन भारती सिंगने तिचं वजन 91 किलोंवरून थेट 76 किलोंवर कमी केलं आहे. यासाठी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ती काहीही खात नाही. शिवाय अधूनमधून उपवाससुद्धा करते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित आहेत. आनंदी राहा, जेवणाचा आनंद घ्या आणि निरोगी राहा, हा तिचा खास मंत्र आहे.

'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राम कपूरने कोणत्याही शॉर्टकटशिवाय वजन कमी केलं आहे. एकेकाळी स्थूल दिसणाऱ्या रामने आता त्याचं वजन 55 किलोंवर आणलं आहे. यामागचं रहस्य म्हणजे पूरक आहार, उपवास आणि प्रचंड मानसिक शक्ती.

'बिग बॉस' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकनेही फक्त तीन महिन्यांत 13 किलो वजन कमी केलं आहे. तिने दिवसातून फक्त एक वेळ जेवण्याची म्हणजे दिवसातून एकदाच खाण्याची दिनचर्या स्वीकारली होती.

कॉमेडियन कपिल शर्माच्या ट्रान्सफॉर्मेशननेही सर्वांना थक्क केलंय. कपिल आता पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि तंदुरुस्त दिसतोय. त्याने अवघ्या 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे. आगामी चित्रपटासाठी त्याने स्वत:मध्ये हा बदल केला आहे.

शहनाज गिल- 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाज गिलने हळदीचं पेय, प्रथिनेयुक्त जेवण आणि रात्रीचं लवकर जेवण यांसारख्या निरोगी दिनचर्येचं पालन करून वजन कमी केलं आहे.

फराह खान- कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. खवय्यी असूनही ती आता दिवसातून फक्त दोनदाच जेवते. अधूनमधून उपवासही करते आणि रात्रीचं लवकर जेवते. तिने तिचा आहात संतुलित ठेवला आहे.