बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप अभिनेता, ज्याने दिला नाही 1 ही हिट चित्रपट, आज 4700 कोटींचा आहे मालक

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप अभिनेता, ज्याने कधीच दिला नाही एकही हिट चित्रपट. मात्र, आज तोच आहे 4700 कोटींचा मालक. मोठ-मोठ्या कलाकारांसोबत करतो व्यवहार.

| Updated on: May 27, 2026 | 2:59 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये कलाकारांना संधी सहज मिळते असे अनेकदा म्हटले जाते. मात्र मोठ्या फिल्मी घराण्यात जन्म झाला म्हणजे यश हमखास मिळतेच असे नाही. काही कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात तर काहींना अनेक संधी मिळूनही यश हुलकावणी देते. अशीच कहाणी आहे अभिनेता गिरीश कुमारची.

बॉलिवूडमध्ये कलाकारांना संधी सहज मिळते असे अनेकदा म्हटले जाते. मात्र मोठ्या फिल्मी घराण्यात जन्म झाला म्हणजे यश हमखास मिळतेच असे नाही. काही कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात तर काहींना अनेक संधी मिळूनही यश हुलकावणी देते. अशीच कहाणी आहे अभिनेता गिरीश कुमारची.

2 / 5

गिरीश कुमार हा प्रसिद्ध निर्माता कुमार एस. तौरानी यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन आणि म्युझिक कंपनी Tips Industries शी संबंधित आहे. मोठ्या बॅनरचा पाठिंबा असल्यामुळे गिरीश यांच्या पदार्पणाकडून प्रेक्षकांना आणि इंडस्ट्रीला मोठ्या अपेक्षा होत्या.

3 / 5

2013 मध्ये गिरीश कुमार यांनी 'रमैया वस्तावैया' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री श्रुती हासन आणि अभिनेता सोनू सूद प्रमुख भूमिकेत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शक प्रभू देवा यांनी केले होते.

4 / 5

मोठ्या प्रमोशननंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. उलट, तो मोठा फ्लॉप ठरला. गिरीश यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘रमैया वस्तावैया’ फ्लॉप झाल्यानंतरही गिरीश कुमारने हार मानली नाही. अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण त्याला यश मिळालं नाही.

5 / 5

अभिनयात यश न मिळाल्यानंतर गिरीश कुमारने आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी Tips Industries मध्ये सक्रिय भूमिका स्वीकारली आणि कंपनीच्या बिझनेस ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. आज तो 4700 कोटींचा मालक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us