Photos: रामायणातील ही ठिकाणे आजही भारतात आहेत अस्तित्वात

Ramayana Places Exist in India : रामायण महाकाव्याशी संबंधित अनेक ठिकाणे आजही भारतात अस्तित्वात आहेत, जी भाविक आणि इतिहास संशोधकांसाठी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. यातील काही प्रमुख ठिकांनांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 09, 2025 | 11:01 PM
1 / 6
अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून, त्यांच्या राज्याची राजधानी होती. सरयू नदीच्या काठावर वसलेले हे शहर आजही महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. येथे राम मंदिराची उभारणीही करण्यात आली आहे.

2 / 6
चित्रकूट, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश : वनवासाच्या काळात राम, सीता आणि लक्ष्मणांनी इथे बराच काळ वास्तव्य केले होते. इथे रामघाट, कामदगिरी आणि भरत मिलाप मंदिर यांसारखी स्थळे आहेत.

3 / 6
पंचवटी (नाशिक), महाराष्ट्र : वनवासात प्रभू रामांनी इथे आपली पर्णकुटी बांधली होती. याच ठिकाणी शूर्पणखेचे नाक कापले गेले आणि रावणाने सीतेचे हरण केले. नाशिकजवळील हे ठिकाण सीता गुफा (सीता गुहा) साठी प्रसिद्ध आहे.

4 / 6
किष्किंधा (हंपी जवळ, कर्नाटक) : हे वानरराज सुग्रीव आणि हनुमान यांचे राज्य होते. आज कर्नाटकातील हंपी जवळील अनेगुंडी या ठिकाणाला प्राचीन किष्किंधा मानले जाते. येथील अंजनेय पर्वत (हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते) आणि पंपा सरोवर प्रसिद्ध आहेत.

5 / 6
दंडकारण्य, मध्य भारत : रामायणात उल्लेख केलेला हा विशाल वनप्रदेश आजच्या छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे. इथे अनेक ऋषी-मुनींचे आश्रम होते.

6 / 6
रामसेतू : तामिळनाडूतील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार बेटांदरम्यान असलेल्या चुनखडीच्या थरांची ही साखळी, श्रीरामांनी बांधलेला पौराणिक सेतू मानली जाते. या स्थळांव्यतिरिक्त, अनेक लहान-मोठी मंदिरे, नद्या आणि आश्रम रामायणातील घटनांशी जोडलेले आहेत.