
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींसारखे दिसणाऱ्यांबद्दल अनेकदा चर्चा असते. आता अभिनेता रणबीर कपूर सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर या व्यक्तीचं नाव आहे जुनैद शाह.

रणबीर कपूर सारखा दिणारा जुनैद शाह श्रीनगरचा होता. मात्र तो आता या जगात नाही. जुनैदचा हृदयविकारामुळे मृत्यू झालाय.

जुनैदचा मृत्यू झाला तेव्हा तो 28 वर्षांचा होता. तो अगदी रणबीरसारखा दिसत होता. व्यवसायानं तो मॉडेल होता. त्यामुळे जुनैद चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध होता.

असं म्हटलं जातं की जुनैदनं मॉडेलिंग करत असताना अनुपम खेरच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला होता.

जुनैदचे फोटो व्हायरल झाले तेव्हा रणबीरचे वडील अभिनेते ऋषी कपूर देखील आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी हे फोटो ट्विटही केले होते. ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं की ते देखील ओळखू शकले नाहीत.

रणबीर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही, मात्र कदाचित जुनैदचा फोटो पाहून त्यांना धक्का बसला होता.