बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची धावपळ सुरु आहे. हे दोघे येत्या 14-15 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, रणवीर आणि दीपिका शनिवारी पहाटे इटलीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते. पहाटे चारच्या सुमारास मुंबईहून इटलीला रवाना झाले. […]
Sachin Patil | सचिन पाटील |
Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची धावपळ सुरु आहे. हे दोघे येत्या 14-15 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, रणवीर आणि दीपिका शनिवारी पहाटे इटलीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते. पहाटे चारच्या सुमारास मुंबईहून इटलीला रवाना झाले.दीपिका – रणवीरला लग्न अविस्मरणीय बनवायचं आहे. लग्नासाठी दीपिका -रणवीरने ड्रेसकोड ठरवला आहे. त्याचनुसार त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले. दीपिका-रणवीरचं लग्न सिंधी आणि तमिळ भारतीय पद्धतीने होणार आहे.बाजीराव मस्तानीच्या ड्रिम वेडिंगमध्ये केवळ 30 खास पाहुण्यांना बोलवण्यात आले आहे.दीपिका-रणवीर इटलीतील लेक कोमो इथं लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दोघांनी लग्नाची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली होती, पण लग्नस्थळ गुप्त ठेवलं आहे.रणवीर-दीपिका लग्न जरी इटलीत करणार असले, तरी त्यांचं जंगी रिसेप्शन मुंबईत होणार आहे. लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे, त्यामुळे अन्य मित्रमंडळींना मुंबईत पार्टी दिली जाईल.दरम्यान, या शाही विवाह सोहळ्यासाठी रणवीर-दीपिकाने सर्व शॉपिंग केलं आहे. दीपिकाने लग्नासाठी तब्बल 20 लाख रुपयांचं मंगळसूत्र बनवून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हे मंगळसूत्र हिऱ्यांचं आहे. मंगळसूत्रासह दीपिकाने हिऱ्यांचे दोन हार खरेदी केले आहेत. दीपिकाने दागिन्यांवरच जवळपास 1 कोटी रुपये खर्च केला आहे. दीपिकाने स्वत:साठीच नाही तर रणवीरसाठीही सोन्याची चेन घेतली आहे. दीपिका-रणवीरला आपलं लग्न खास करायचं आहे. या रॉयल लग्नासाठी काही खास अटीही घालण्यात आल्या आहेत. या लग्नासाठी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांकडून एक बॉन्ड लिहून घेण्यात आला आहे. त्यानुसार या लग्नात जो मेन्यू बनवण्यात येणार आहे, तो यापुढे कुठेही, कधीही बनवला जाऊ नये. जर खरंच असं झालं, तर हे लग्न इतिहास रचेल.