
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा असेल. काही महत्त्वाची कामं पार पडतील. त्याचे दूरोगामी परिणाम दिसून येतील. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

घरातील काही अडचणींमुळे दिवस कसाबसा जाईल. अडचणींवर मात करण्यासाठी जवळच्या मित्रांची मदत घ्या. दिवसअखेर चांगला तोडगा निघू शकतो. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा घेता येईल यासाठी आग्रही राहा. सर्व काही पैसा नसतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

भावंडांसोबत काही कारणांमुळे वाद होऊ शकतात. काही योजना आज बंद करण्याची वेळ येईल. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं अशी अनुभूती येईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

आजचा आर्थिकदृष्टीने चांगला जाईल. योग्य कामासाठी पैसा खर्च करा. विनाकारण न कामाच्या गोष्टी घेऊ नका. त्या तशाच अडगळीत पडून राहून काहीच फायदा होणार नाही. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. काही किचकट गोष्टी सहजरित्या सोडवाल. पण काही ठिकाणी निराशा पदरी पडेल. पण नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

गेल्या काही दिवसात केलेल्या चुकांचं आत्मपरिक्षण करण्याची वेळ आहे. उगाचच रागरुसवा असेल तर तो सोडून द्या. आपल्या जवळच्या लोकांना समजून घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

जवळच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो. काही व्यवहारांमध्ये आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे जवळच्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

कधी कधी आपल्या जवळचे लोकं आपली मजा घेत असतात. त्याची अनुभूती आज तुम्हाला येईल. घरातील वादाकडे दुर्लक्ष करा. वाद सामंजस्यपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)