
हिंदू धर्मात रुद्राक्ष हे सर्वात प्रभावी मानलं गेलं आहे. रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून अडचणी सोडवल्या जातात. व्यवसायात तुम्हाला सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित प्रगती मिळत नसेल,तुम्ही दहामुखी, तेरामुखी, एकमुखी आणि चौदामुखी रुद्राक्ष धारण करावेत. यामुळे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल आणि अडचणी दूर होतील.

वैद्यकीय व्यवसाय: वैद्यकीय व्यवसायात यश मिळविण्यासाठी तीनमुखी, चारमुखी, नऊमुखी, दहामुखी आणि अकरामुखी रुद्राक्ष धारण करावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, हे सर्व रुद्राक्ष डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी खूप शुभ मानले जातात.

कायदेशीर व्यवसाय: ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कायदेशीर व्यवसायात प्रगती करण्यासाठी आणि इच्छित यश मिळविण्यासाठी तुम्ही एकमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. पाच मुखी आणि तेरा मुखी असलेले रुद्राक्ष खूप फायदेशीर असतात.

राजकारण: जर तुम्हाला राजकीय क्षेत्रात तुमचे स्थान मजबूत करायचे असेल किंवा या क्षेत्रात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढवायची असेल. तसेच तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकमुखी, तेरामुखी आणि चौदामुखी रुद्राक्ष धारण करावा.

अभियांत्रिकी व्यवसाय: अभियांत्रिकी क्षेत्रात यश मिळविण्यासाठी नऊमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष धारण करावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, तांत्रिक काम करणाऱ्यांसाठी हे रुद्राक्ष खूप शुभदायी आहेत. (सर्व फोटो- TV9 Network)