
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांचा लग्नसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला. कुटुंबातील काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. तसेच केवळ जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात आले होते. पण लग्नाच्या तीन दिवसातच विजय आणि रश्मिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते 'आम्ही एकमेकांसाठी नाही' असे बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

ऑनस्क्रीन जोडी म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही जोडी आता रिअल लाइफमध्येही एक झाली आहे. चाहत्यांना नेहमीच वाटायचं की हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. पण लग्नाच्या केवळ तीन दिवसांनंतर सोशल मीडियावर त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला, ज्यात सुरुवातीला ते "We are not made for each other" असं म्हणतात.

या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे असल्याचे दाखवण्यात आले आहे. एकमेकांशी भांडणं, मजाक, फरक दाखवत "आम्ही एकमेकांसाठी नाही" असं म्हणतात. पण व्हिडीओच्या शेवटी ते हसत-खिदळत "We are made for each other" असं म्हणतात आणि एकमेकांना वरमाला घालून लग्नाचं सीनही रीक्रिएट करतात.

हा व्हिडीओ एक फन, प्लेफुल आणि रोमँटिक स्टोरी आहे, ज्यात त्यांच्या विरोधाभासी व्यक्तिमत्त्वांमधूनही त्यांची मैत्री आणि प्रेम किती मजबूत आहे हे दाखवलं आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांना लग्नानंतरची पहिली अस्वस्थता वाटली, पण प्रत्यक्षात हे त्यांच्या लग्नाची आणि प्रेमाची एक क्यूट, हृदयस्पर्शी गोष्ट आहे.

रश्मिका आणि विजय यांनी लग्न होईपर्यंत त्यांच्या लग्नाची बातमी सीक्रेटच ठेवली होती. शेवटी लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली. आता त्यांचा हा एक जाहिरातीचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.