
राखी सावंत हिच्यावर नुकताच शस्त्रक्रिया झालीये. छातीत वेदना होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. राखीच्या गर्भाशयात ट्यूमर आहे आणि त्यावरच शस्त्रक्रिया करण्यात आली.

आता नुकताच राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने मोठे अपडेट शेअर केलंय. रितेशने सांगितले की, तब्बल तीन तास राखीवर शस्त्रक्रिया सुरू होती.

अजूनही राखी बेशुद्धच आहे. कारण ही अत्यंत मोठी शस्त्रक्रिया होती. राखीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगतानाही रितेश दिसतोय.

शुक्रवारी रात्री उशीरा राखी सावंत हिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राखीचे रूग्णालयातील काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

अनेकांना सुरूवातीला वाटले की, राखी नाटक करत आहे. मात्र, त्यानंतर रितेश सिंह हा सतत राखी सावंतचे हेल्थ अपडेट शेअर करताना दिसतोय.