
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

नुकतंच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रुपालीनं हटके अंदाजात एंट्री केली होती.

तिच्या या लूकनं सर्वांचीच मनं जिंकली. आता याच लूकमध्ये तिनं एक फोटोशूट केलं आहे.

या हटके लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

‘MERMAID’ या टाईपचा हा ड्रेस आहे. तिचे हे फोटो चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.