
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. समाधान सरवणकर हा अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लग्न करत असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला होता. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. आता 4 डिसेंबर रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडला. सध्या सर्वत्र समाधान आणि तेजस्विनीच्या लग्नातील फोटोंची चर्चा सुरु आहे.

समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचा विवाहसोहळा 4 डिसेंबर रोजी मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय मंडळींपासून ते कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

लग्नात तेजस्विनीने गुलाबी रंगाची साड़ी नेसली होती. त्यावर तेजस्विनीने गळ्यात नेकसेल, केसात गजरा, हातात बांगड्या, सिंपल लूक केला आहे. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे समाधानने अफव्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांचाही लूक पाहण्यासारखा होता.

रिसेप्शनला तेजस्विनीने लाल रंगाचा हेवी लेहंगा परिधान केला होता. मोकळे केस, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा, कपाळी टिकली अशा लूकमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती. तर समाधानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. त्यावर काळ्या रंगाची मोजडी देखील घातली होती. या लूकमध्ये समाधान अतिशय हॅडसम दिसत होता. सध्या त्यांच्या रिसेप्शनचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

समाधान आणि तेजस्विनीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले होते. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, सुशांत शेलार, हार्दिक जोशी, अक्षया देवधर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली.