
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानचं कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सलमानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आहेत. सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला यांची चार मुलं आहेत.

सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. हेलन आणि सलीम यांना कोणतीच मुलं नाहीत. एकेदिवशी मॉर्निंग वॉकला जाताना त्यांची नजर एका छोट्या मुलीवर गेली. एक छोटी मुलगी फुटपाथवर तिच्या आईच्या मृतदेहाजवळ उभी राहून रडत होती.

सलीम खान यांना त्या मुलीची खूप दया आली आणि त्यांनी तिला आपल्यासोबत घरी नेलं. नंतर हेलन आणि सलीम खान यांनी त्या मुलीला कायदेशीररित्या दत्तक घेतलं. तिला दत्तक घेऊन अर्पिता असं नाव दिलं. अर्पिताने आयुष शर्माशी लग्न केलंय.

पैशांसाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केलं, असं अनेकदा आयुषला ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर खुद्द आयुषने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.

आयुषने अर्पिता खानशी 18 नोव्हेंबर 2014 रोजी लग्न केलं. या दोघांना आयात ही मुलगी आणि अहिल हा मुलगा आहे. “जे लोक असा विचार करतात की मी सलमान भाईचे पैसे उडवतो, त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी कधीच त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत, असं त्याने स्पष्ट केलं होतं.