संदीप खरेंच्या लेकीचा साखरपुडा; होणारा पती लोकप्रिय अभिनेता

गीतकार आणि कवी संदीप खरे यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. लोकप्रिय अभिनेत्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 2:50 PM
1 / 5
प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. 13 डिसेंबर रोजी रुमानीने प्रसिद्ध अभिनेत्याशी साखरपुडा केला असून त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2 / 5
रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने राधा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'दुर्गा' या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. रुमानीने तिच्या सहज अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

3 / 5
रुमानीने अभिनेता स्तवन शिंदेशी साखरपुडा केला आहे. स्तवनने मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत त्याने भूमिका साकारली. याशिवाय तो 'क्लास ऑफ 83', 'पार्टी' या चित्रपटांमध्येही झळकला.

4 / 5
साखरपुड्यात रुमानीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर साजेरे दागिने, हेअरस्टाइल आणि मेकअप.. असा तिचा सुंदर लूक होता. तर स्तववने कुर्ता पायजमा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शॉल घेतला होता. गुडघ्यावर बसून त्याने रुमानीला अंगठी घातली.

5 / 5
रुमानी आणि स्तवनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, मिताली मयेकर, ऋजुता देशमुख, पूर्वा कौशिक, अश्विनी महांगडे यांसारख्या कलाकारांनीही कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.