
अभिनेत्री सारा अली खान प्रत्येक सण मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करते. आता देखील साराने कुटुंबासोबत रक्षाबंधन सण साजरा केला आहे. साराने इन्स्टाग्रामवर फोटो देखील शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर सारा हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगत आहेत..

सारा हिने इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि जेह अली खान यांना राखी बांधली. फोटोमध्ये खान कुटुंब आनंदात दिसत आहे. शिवाय सैफ अली खान याने देखील बहिणींसोबत आनंदाचे क्षण साजरे केले.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त खान कुटुंबाची चर्चा रंगत आहे. सारा आणि इब्राहिम दोघे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलं आहेत. सारा आई अमृता हिच्यासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सैफ अली खान याने दुसरं लग्न अभिनेत्री करीना कपूर खान हिच्यासोबत लग्न केलं. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांची नावे आहेत.

करीना हिच्यासोबत सारा आणि इब्राहिम यांचे संबंध चांगले आहेत. कोणत्याही सणाला करीना आणि सैफ यांच्या घरी जाते. सारा आणि करीना यांचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.