
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वनविभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्याने चांगलीच धांदल उडाली होती.

शेवडीपाडा गावात काही ग्रामस्थ विहिरी जवळून जात असताना बिबट्याचा आवाज जाणवल्याने ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून बघितले

बिबट्या विहिरीमध्ये पडलेला ग्रामस्थांना आढळून आला, या संदर्भात तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली

तोपर्यंत गावात एकच दहशतीचे वातावरण पसरले होते. बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

माहिती मिळतात वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले.

यावेळी अनेक ग्रामस्थांनी घराच्या छतावरून, गच्चीवरून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह पाहिले आणि मोबाईलमध्ये कैद पण केले.

वनविभागाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचावकार्यानंतर बिबट्याचा जीव वाचला आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ या बिबट्याला तत्काळ पिंजऱ्यात कैद केले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला तात्काळ पिंजऱ्यामध्ये कैद केले आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार आहे.