उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे, महामानवाच्या स्मारकाचे काम कुठपर्यंत आले,पाहा..

१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब यांची आज ( सोमवार ) जयंती.....घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. या अद्वितीय अशा भव्य स्मारकाचे काम इंदूमिल परिसरात वेगाने सुरु आहे.या इंदू मिल परिसरातील बाबासाहेबांच्या भव्य स्मारक प्रकल्पाचा आढावा एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकताच घेतला. त्या बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम कुठपर्यंत आले आहे हे कळते. हा केवळ पुतळा नसून ज्ञानाची आस ज्यांना आहे त्या सर्वांसाठी हा परिसर महत्वाचा ठरणार आहे.

| Updated on: Apr 13, 2025 | 9:42 PM
1 / 5
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी दादर येथील इंदू मिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. या आढावा भेटीतून प्राधिकरणाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतानाच  हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

2 / 5
स्मारकाच्या प्रवेश प्रांगणाचे काम ८८.५% पूर्ण झाले आहे. तसेच व्याख्यानगृहाचे काम ७८.७५% टक्के  पूर्ण झाले आहे. ग्रंथालयाचे काम ८१%  पूर्ण झाले आहे. तर प्रदर्शन आणि प्रेक्षागृहाचे काम ६८% टक्के पूर्ण झाले असून ते  ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. पदपथ इमारतीचे काम हे ५२.८% टक्के पूर्ण झाले आहे.

3 / 5
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे.  पुतळ्यासाठी १३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टील खरेदी पूर्ण झालेली आहे. १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. एकूण १०,५१० चौ.मी. पैकी ३०८ चौ.मी. कांस्य पॅनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे.

4 / 5
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी बाबासाहेबांच्या या भव्य स्मारकाशी सर्व संबंधित यंत्रणांना काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले असून हे स्मारक वेळेत पूर्ण होईल असा संकल्प  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केला आहे.

5 / 5
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक प्रकल्पातील काही महत्त्वाच्या प्रकल्प घटकांत लक्षणीय प्रगती झाली आहे. जसे डबल बेसमेंट (पार्किंग)चे काम ९५%  पूर्ण झाले असून ते ३१ मे, २०२५ पर्यंत पूर्ण होईल असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.