
बॉलिवूडमध्ये स्टार किडसची एन्ट्री काही नवीन नाही. कोणत्याना कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून स्टार किडसची धमाकेदार एन्ट्री केलीच जाते. आता अजून एका स्टार किडसची एन्ट्री बॉलिवूडमध्ये होणार आहे.

कपूर घराण्यातील एक लाडकी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सोनम कपूरची चुलत बहिण शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूर आणि महीप संधू यांची मुलगी आहे. शनाया कपूरने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे.

शनाया 'आखों की गुस्ताखियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात शनाया कपूरसोबत बॉलिवूडचा स्टार अभिनेता विक्रांत मेस्सी दिसणार आहे. चित्रपटात शनाया आणि विक्रांतचा रोमान्स पाहायला मिळणार आहे.

'आँखों की गुस्ताखियां' च्या शूटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर करत शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले, आहे "प्रेम आंधळं असतं की आंधळं प्रेम असतं? प्रेमात पडणं ही बाब किती विलक्षण आहे. मिनी फिल्म्स तुमच्यासाठी ‘आंखों की गुस्ताखियां’ घेऊन येत आहे, जो रोमान्सचा नवा अनुभव असेल. प्रेम आणि उत्तम संगीताच्या या अविस्मरणीय प्रवासात आमच्यात सामील व्हा".

Shanaya Kapoor's Bollywood Debut Aankhon Ki Gustakhiyan Movie