
कडुलिंब आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपाय आहे. कडुलिंबामुळे त्वचेच्या असंख्य समस्या दूर होण्यासही मदत होते. विशेष म्हणजे शरीरावरील जखमाही दूर होण्यास मदत होते.

फक्त कडुलिंबच नाही तर हळदही अनेक समस्यांवर मोठा उपाय आहे. पूर्वीच्या काळी जखमेवरही हळद लावली जात असत. हळदीमध्ये आणि कडुलिंबामध्ये नैसर्गिकरित्या जिवाणू-विरोधी आणि दाह-विरोधी गुणधर्म असतात.

हळद आणि कडुलिंब मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते

जर तुम्ही कडुलिंबाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावली तर त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. फक्त पिंपल्सच नाही तर त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते.

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि साधारणपणे 20 मिनिटात घुवून टाका. ज्यावेळी त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. तुम्हाला महागड्या स्किन केअर क्रीमही वापरण्याची वेळ येणार नाही.