
अभिनेत्री सोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांचा काल ( 4 डिसेंबर) थाटामाटात विवाह झाला. सोभिता धुलिपाला हिला साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरून खरी ओळख मिळाली. 'मेड इन हेवन' आणि 'बार्ड ऑफ ब्लड' सारख्या मालिकांसाठी ती ओळखली जाते. जास्त चित्रपटांमध्ये चमकली नसली तरीही कोट्यवधींची मालकीण आहे. ( Photos : Instagram)

तिला शो बाजीची जास्त आवड नाही हे सोशल मीडियावरील सोभिताच्या पोस्ट पाहून दिसतं. ती अनेकदा साध्या स्टाईलमध्ये दिसते. शोभिता धुलिपालाचे कुटुंबही अनेकदा लाइमलाइटपासून दूर असते.

मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली सोभिता धुलिपाला तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 70 लाख ते 1 कोटी रुपये फी आकारते. मणिरत्नम यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्रीने आतापर्यंतचे सर्वाधिक 1 कोटी रुपये शुल्क आकारले होते.

नागा चैतन्यची नववधू सोभिताने खूप चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेले नाही,त्यामुळेच तिची फी देखील खूप कमी आहे. रिपोर्ट्सुनासर तिच्याकडे 7 ते 10 कोटी रुपये संपत्ती आहे.

नागा चैतन्यसोबतच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर सोभिताची, त्याची माजी पत्नी समंथा रुथ प्रभूशी तुलनाकेली जात आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सोभिता ही कमाईच्या बाबतीत समांथाच्या आसपासदेखील नाहीये.

दक्षिण चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या समंथा रुथ प्रभूने काही काळापूर्वीच हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला. ती वरुण धवनसोबत सिटाडेल हनी बनीमध्ये दिसली होती. या ॲक्शन सीरिजसाठी समांथाने 10 कोटी रुपयांची तगडी फी आकारली.

समांथा तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 3.5 ते 4 कोटी फी आकारते. पुष्पा द राइज या चित्रपटामधील आयटम साँगसाठी समांथाने 5 कोटी रुपये फी आकारली होती. ती केवळ चित्रपटांमधीनत नव्हे तर जाहिरातींच्या माध्यमातूनही बक्कळ पैसे कमावते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभू 101 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर समंथा अभिनेत्री शोभिता धुलिपाला पेक्षा 10 पट जास्त कमावते.

लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, समंथाकडे 8 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट आणि 15 कोटी रुपयांचा सी-फेसिंग अपार्टमेंटची आहे.